रुग्णांना आता टेट्रा पॅकचे दूध

रुग्णांना मोफत औषधोपचार देणाऱ्या मुंबई महापालिकेकडून रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.
रुग्णांना आता टेट्रा पॅकचे दूध

मुंबई : पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना आता टेट्रा पॅकचे शुद्ध दूध मिळणार आहे. टेट्रा पॅकचे गरम करण्याची गरज नाही. तसेच आरेचे दूध महागल्याने टेट्रा पॅकचे शुद्ध दूध खरेदीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ७६ लाख टेट्रा पॅकची ऑर्डर देण्यात येणार असून, यासाठी ४२.८२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

रुग्णांना मोफत औषधोपचार देणाऱ्या मुंबई महापालिकेकडून रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. रुग्णांच्या सुदृढ आरोग्यासाठी रुग्णांना याआधी आरेचे दूध देण्यात येत होते. परंतु आरेचे दूध महागल्याने अन्य कंपनीकडून दूध पुरवठा करण्यासाठी निविदा मागवल्या.; मात्र निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने टेट्रा पॅकचे शुद्ध दूध खरेदीचा निर्णय घेतला आहे.

सध्या रुग्णांना दूध उकळून द्यावे लागते. पण जेव्हा आम्ही टेट्रा पॅकमध्ये दूध देणे सुरू करण्यात येईल तेव्हा स्वयंपाकघरात दूध उकळण्याची गरज भासणार नाही. ज्यामुळे मानवी श्रमाची बचत होईल. तसेच सुरक्षितता वाढणार असून, टेट्रा पॅकमधील दूध हे पिण्यासाठी सुरक्षित असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

‘असा’ होणार दुधाचा पुरवठा

पालिका रुग्णालयाच्या प्रत्येक मागणीनुसार, १०० मिली, १५० मिली, २०० मिली, ५०० मिली आणि १००० मिलीच्या पॅकमध्ये हा पुरवठा केला जाणार आहे. यासाठी पालिका दरवर्षी विविध आकारांच्या ७५ लाख ८३ हजार २० टेट्रा पॅकची मागणी नोंदवणार आहे. प्रत्येक रुग्णाला १००,१५० आणि २०० मिली दूध दिले जाईल. पालिका रुग्णालयांमध्ये सद्यस्थितीत दुधाची वार्षिक मागणी सुमारे ४.७८ कोटी लिटर आहे.

तापवायची गरज नाही, रेडी टू ड्रिंक

७६ लाख टेट्रा पॅकसाठी

४३ कोटींचा खर्च

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in