पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय दुहेरी प्रकल्पाचा मार्ग मोकळा

या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला असून, प्रकल्पाआड येणारे वृक्ष हटवून लवकरच रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय दुहेरी प्रकल्पाचा मार्ग मोकळा

पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय दुहेरी मार्ग प्रकल्पासाठी विविध अडथळे येत होते; मात्र नुकतेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वनजमीन मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (एमआरव्हीसी) हस्तांतरित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला असून, प्रकल्पाआड येणारे वृक्ष हटवून लवकरच रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

पनवेल-कर्जतदरम्यान एकच मार्गिका असून, त्याचा वापर लांब पल्ल्याच्या गाड्या अथवा मालवाहतुकीसाठी होत आहे. कर्जत आणि पनवेलमधील प्रवाशांना ठाणे किंवा कुर्लामार्गे लोकलने जावे लागते; अन्यथा रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो; मात्र त्यात बराच वेळ वाया जातो. परिणामी, पनवेल-कर्जत अशी थेट लोकल सुरू झाल्यास त्याचा फायदा अनेक प्रवाशांना होऊ शकतो. त्यासाठी येथे नवीन उपनगरीय मार्गिका बनवण्याचा निर्णय घेण्यात आला असून एमयूटीपी-३ अंतर्गत एमआरव्हीसीने या मार्गिकेचे काम हाती घेतले. दरम्यान, दुहेरी मार्गासाठी सरकारी, खासगी आणि वन अशा एकूण १३५.८९३ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. यापैकी ७४ टक्के भूसंपादन झाले असून २५.६१ टक्के भूसंपादन बाकी आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in