Mumbai : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्येचा फैसला लांबणीवर

बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणाचा निर्णय आणखी लांबणीवर पडला आहे.
Mumbai : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्येचा फैसला लांबणीवर
Mumbai : पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्येचा फैसला लांबणीवर
Published on

मुंबई : बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणाचा निर्णय आणखी लांबणीवर पडला आहे. या खटल्यातील आरोपी वैद्यकीय कारणास्तव न्यायालयात हजर न राहिल्याने विशेष सीबीआय न्यायालयाने याप्रकरणीचा निर्णय १६ जूनपर्यंत तहकूब ठेवला. या दिवशी सर्व आरोपीना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रभावशाली नेते पवनराजे निंबाळकर ३ जून २००६रोजी मुंबईहून उस्मानाबादला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचाही मृत्यू झाला होता. दिवसाढवळ्या झालेल्या या दुहेरी हत्येमुळे संपूर्ण राज्य हादरले होते.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडे होता. मात्र, हत्येमागील कट आणि त्यातील गंभीर आरोप लक्षात घेता हा तपास नंतर केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. राजकीय वादातून ही हत्या घडवून आणण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. तसेच २५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा आणि जवळपास १६ महिने हत्येची रेकी व नियोजन सुरू असल्याचा दावा तपासात करण्यात आला. सीबीआयने याप्रकरणी सुरुवातीला शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव, तसेच शशीकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, जैन यांना अटक केली, तर २००९ मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक केली.

विशेष सीबीआय कोर्टासमोर सुनावणी झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय १४ मे रोजी देण्याचे निश्चित केले होते.

logo
marathi.freepressjournal.in