मुंबई : ठरलेल्या मुदतीत मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २५ मे २०२४ हा मालमत्ता कर भरणा करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी मुदतीपूर्वी करभरणा करून संभाव्य दंडाची कारवाई टाळावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पालिकेच्या करसंकलन व करआकारणी विभागाच्या वतीने कर वसूली करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. समाज माध्यमांद्वारे संपर्क करुन तसेच गृहनिर्माण संस्थेतील सदनिकानिहाय करवसुलीचे कामकाज कार्यरत आहे. मालमत्ताधारकांना करभरणा करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती तसेच आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळीच कर जमा करुन दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे पालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.
‘टॉप टेन’ मालमत्ताधारक
१) ऑनेस्ट शेल्टर, श्रीराम मिल्स (जी दक्षिण विभाग) - ३० कोटी ६३ लाख ३० हजार १५१ रुपये
२) बॉम्बे टिन प्रिंटर्स (पी दक्षिण विभाग) - १२ कोटी ८५ हजार ८८० रुपये
३) श्री सद्गुरू ॲन्ड डिलक्स जॉईंट व्हेंचर्स (जी दक्षिण विभाग) - १० कोटी ४६ लाख ५७ हजार ४२ रुपये
४) निवन अपार्टमेंट (एच पश्चिम विभाग) - ०५ कोटी ४४ लाख ०३ हजार ४७७ रुपये
५) रूणवाल कन्स्ट्रक्शन (टी विभाग) - ०५ कोटी २४ लाख ५६ हजार ४३७ रुपये
६) समाधान सहकारी गृहनिर्माण सोसायटी ( पी दक्षिण विभाग) - ०५ कोटी १२ लाख ३८ हजार ३८८ रुपये
७) रूणवाल कन्स्ट्रक्शन (टी विभाग) - ०४ कोटी ६४ लाख ९३ हजार ५४९ रुपये
८) दर्शन डेव्हलपर्स (आर दक्षिण विभाग) - ०४ कोटी ४१ लाख ६१ हजार १२६ रुपये
९) टान्सकॉन ट्रीम्प (के पश्चिम विभाग) - ०४ कोटी ३५ लाख ०९ हजार ७१५ रुपये
१०) सुप्रीम कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपर्स (एम पश्चिम विभाग) - ०१ कोटी ५७ लाख ३२ हजार ३०४ रुपये