कारची रिक्षाला धडक लागून पादचाऱ्याचा मृत्यू

डॉक्टरांनी मृत घोषित केले
कारची रिक्षाला धडक लागून पादचाऱ्याचा मृत्यू

मुंबई : गोरेगाव येथे कारचे नियंत्रण सुटल्याने कारने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात सुरेश पुजारी या पादचाऱ्याचा मृत्यू झाला तर रिक्षाचालक सुभाषचंद्र मुन्नीलाल यादव हा गंभीररीत्या जखमी झाला. याप्रकरणी कारचालक निलेश रामसेवक जैस्वाल याला वनराई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस, तर रिक्षाचालकाला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, याच गुन्ह्यांत नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात मंगळवारी २९ ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजता गोरेगाव येथील एसआरपीएफ ग्रुप क्रमांक आठजवळील सिग्नलजवळ झाला. सुभाषचंद्र हा रिक्षाचालक असून, २९ ऑगस्टला तो दहिसर येथून जोगेश्‍वरीच्या दिशेने जात होता. त्याचवेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने एका बेलोरो कारने त्याच्या रिक्षाला जोरात धडक दिली. त्यात रिक्षा दोन वेळा पलटी होऊन ब्रिजच्या खाली गेली. त्यानंतर या कारने एका पादचाऱ्याला धडक दिली होती. अपघातात सुभाषचंद्र यादवसह पादचारी असे दोघेही जखमी झाले होते. त्यामुळे या दोघांनाही जवळच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे या पादचाऱ्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in