पेडणेकर यांची दोन तास चौकशी; बुधवारी पुन्हा चौकशी होणार

आर्थिक गुन्हे शाखेनंतर ईडीनेही त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे
पेडणेकर यांची दोन तास चौकशी; बुधवारी पुन्हा चौकशी होणार

मुंबई : कोरोना काळातील बॉडी बॅग खरेदीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांची सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. दोन तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले, मात्र त्यांना येत्या बुधवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स देण्यात आले आहे.

सोमवारी अकरा वाजता त्या आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. ११.३० वाजल्यानंतर त्यांची या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. दोन तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. या चौकशीचा तपशील समजू शकला नाही, मात्र आपल्यावरील आरोपांचs किशोरी पेडणेकर यांनी खंडन केले आहे. त्यांची जबानी नोंदविण्यात आली असून ही जबानी अपूर्ण राहिल्याने त्यांना बुधवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेनंतर ईडीनेही त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या संपूर्ण प्रकरणात मनीलॉड्रिंग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ईडीने हा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात लवकरच त्यांची ईडीकडूनही चौकशी होणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आगामी काळात किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे.

मुंबईच्या महापौरपदी असताना, त्यांच्या आदेशावरून कोरोना काळात मृत झालेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी बॉडी बॅग खरेदी करण्यात आली होती. या बॉडी बॅगची किंमत दीड ते दोन हजार रुपये असताना ते बॅग ६,८०० आठशे रुपयांना विकत घेण्यात आले होते. त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर मनपा अधिकाऱ्यांविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा नोंदविण्यात आला होता. किशोरी पेडणेकर यांना यापूर्वीच मुंबई हायकोर्टाने चार आठवड्यांचे अंतरिम संरक्षण दिले आहे.

कोरोना काळात बॉडी बॅग खरेदीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. दोन तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले, मात्र त्यांना येत्या बुधवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स देण्यात आले आहे.

सोमवारी अकरा वाजता त्या आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. साडेअकरानंतर त्यांची या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. दोन तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. या चौकशीचा तपशील समजू शकला नाही. मात्र आपल्यावरील आरोपांचे किशोरी पेडणेकर यांनी खंडन केले आहे. त्यांची जबानी नोंदविण्यात आली असून ही जबानी अपूर्ण राहिल्याने त्यांना बुधवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेनंतर ईडीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात लवकरच त्यांची ईडीकडूनही चौकशी होणार असल्याचे बोलले जाते.

logo
marathi.freepressjournal.in