Pen : अखेर पेणमधील 'त्या' आदिवासी वाड्यांतील आदिवासींना मतदान नोंदणीसह इतर सुविधांची उगवली पहाट

आदिवासी वाड्यांतील (Pen) आदिवासींच्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाकडून तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली असल्याने प्रजासत्ताक दिनाचे आंदोलन तात्पुरते स्थगित
Pen : अखेर पेणमधील 'त्या' आदिवासी वाड्यांतील आदिवासींना मतदान नोंदणीसह इतर सुविधांची उगवली पहाट

पेण (Pen) तालुक्यातील पाच पाच आदिवासी वाड्यात गेली ७५ वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानासह मूलभूत मूलभूत सुविधांपासून वंचित असणाऱ्या आदिवासी वाड्यांना सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या आंदोलनाने न्याय मिळणार आहे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने केलेल्या आंदोलनाच्या झटक्याने शासनाला जाग आली असून मतदार नोंदणी करण्यासह जल जीवन मिशन मधील पाणीपुरवठा योजनेस प्रारंभ करण्यात असल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालय धडकून आदिवासींच्या हस्ते गजवंदन करणार असल्याचा इशारा १३ जानेवारी रोजी पेण पंचायत समितीवर हजारो आदिवासींनी काढलेल्या मोर्चा दरम्यान दिला होता. याची दखल घेत प्रशासनाकडून तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली असल्याने दिनांक २६ जानेवारीच्या रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावरील धडक मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यातील तांबडी, काजूची वाडी, खऊसावाडी, केळीचीवाडी आणि उंबरमाळ या पाच आदिवासी वाडयांतील आदिवासी बांधवांनी ७५ वर्षात एकदाही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केलेले नाही. त्यांना भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा संविधानिक हक्कही बजावता आलेला नाही. त्यामुळे त्यांचा विकास खुंटला असून या आदिवासी बांधवांना रस्ता, वीज,पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध झालेल्या नाहीत.

या सर्वाचा निषेध म्हणूनच सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांचे नेतृत्वाखाली १३ जानेवारी रोजी पेण पंचायत समिती कार्यालयावर पाचही आदिवासी वाड्यातील आदिवासी बांधवांनी निषेध मोर्चा आणून "आम्ही आदिवासी भारताचे नागरिक नाहीत का ? " असा सवाल प्रशासनाला विचारत. २६ जानेवारी पर्यंत मतदार नोंदणी व इतर पाच मागण्यांवर कारवाई न झाल्यास रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रजासत्ताक दिन धडकणार असल्याचा इशारा ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी कळविले होते या आंदोलनाची दखल घेत उंबरमाळ तांबडी कसा वाडी काजूची वाडी केळीची वाडी या पाचही वाड्यांमध्ये जलजीवन मिशन योजनेच्या कामास प्रारंभ करण्यात आले आहे.

तर पेण तहसील कार्यालयाच्या वतीने दोन दिवसीय मतदार नोंदणी अभियान पाचही वाड्यांसाठी राबवून बुधवारी तांबडी येथे आदिवासी बांधवांची मतदार नोंदणी करून घेत त्यांना दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डही वितरीत करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दादासाहेब सोनवणे,बी एल डी हेमलता तायडे, मंडळ अधिकारी सुरेंद्र एम. ठाकुर,ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते राजू पाटील, सचिन पाटील, निवडणूक कारकुन पंडित राठोड, पुरवठा अहवाल कारकून यतीराज गरुड, अस्मिता गावंड, नीलम म्हात्रे आदि उपस्थित होते. दरम्यान प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत असल्याने दिनांक २६/०१/२०२३ रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणारा धडक मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात येत असल्याचे ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष एडवोकेट सिद्धार्थ इंगळे यांनी प्रशासनास कळविले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in