सुप्त क्षय रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची मोफत आय.जी.आर.ए.’ चाचणी करण्यात येणार

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबवण्यात येणार
सुप्त क्षय रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची मोफत आय.जी.आर.ए.’ चाचणी करण्यात येणार

मुंबई क्षयरोग मुक्तीसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमा अंतर्गत सुप्त क्षय रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची अत्याधुनिक पद्धतीने मोफत आय.जी.आर.ए.’ चाचणी करण्यात येणार आहे. दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईतून क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णाच्या थुंकीमध्ये क्षयरोगाचे जंतू आढळून येतात, अशा क्षयरोगाचे निदान झालेल्या रूग्णाच्या निकटच्या संपर्कातील, निकटच्या सहवासातील व्यक्तिंची व कुटुंबियांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. ही चाचणी प्रामुख्याने घरातील इतर कुटुंबियांना क्षयरोग आजार असल्याबाबत देखील निदान व्हावे, या दृष्टीने त्यांची क्षयरोग विषयक आय.जी.आर.ए. ही अत्याधुनिक वैद्यकीय चाचणी मोफत करण्यात येणार आहे.

या चाचणीत एखाद्या सुदृढ व्यक्तिला क्षयरोगाची लक्षणे नसताना देखील क्षयरोगाचे संक्रमण झाले असल्यास, त्याची खात्री करण्यासाठी आय.जी.आर.ए. चाचणी करण्यात येते, असे ही त्या म्हणाल्या. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून क्षयरोगाचे निदान झालेल्या व्यक्तिची त्या पुढील २ वर्षे पर्यंत नियमितपणे पाठपुरावा तपासणी करण्यात येणार आहे. या प्रकारची पाठपुरावा तपासणी प्रत्येक ६ महिन्यातून एकदा यानुसार करण्यात येईल.

२४ तासांत रिपोर्ट!

ही चाचणी प्रामुख्याने सुप्त क्षयरोगाच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी ‘आय.जी.आर.ए.’ चाचणी करावी लागते. या चाचणीचा अहवाल चाचणी केल्यापासून २४ तासांमध्ये मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in