राजकीय होर्डिंगवर कायमस्वरूपी बंदी घाला; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रात गेल्या दोन- अडीच वर्षांपासून राजकीय धुमाकूळ घातला जात आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात राजकीय पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंगमुळे शहरांचे विद्रुपीकरण होत आहे.
आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या दोन- अडीच वर्षांपासून राजकीय धुमाकूळ घातला जात आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात राजकीय पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंगमुळे शहरांचे विद्रुपीकरण होत आहे. २०२५ या नवीन वर्षांत लोकहिताचा संकल्प करत राजकीय पोस्टर्स बॅनर्स होर्डिंगवर कायमस्वरुपी बंदी घाला, अशी मागणी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

जुलै २०२२ पासून राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असता यातच राजकीय पोस्टर्स बॅनर्स होर्डिंगबाजी मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. जगात कुठेही असे राजकीय पोस्टर लावले जात नाहीत. मात्र आपल्याकडे अनेक ठिकाणी बेकायदेशीररीत्या होर्डिंग लावण्यात येतात. यामुळे शहरे विद्रुप होत आहेत. एक नागरिक म्हणून खंत वाटते, असे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

होर्डिंगवर प्रतिबंध घातल्यास आपली शहरे स्वच्छ दिसतीलच, शिवाय आपल्या कार्यकर्त्यांनाही अशा खर्चातून दिलासा मिळेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

याबाबत ठोस निर्णय घेतल्यास आपण आपल्या पाठीशी राहू. आपण या विषयावर बैठक बोलावली किंवा सर्व पक्षांना पत्र लिहिले, तर मी, माझा पक्ष आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील,

- आदित्य ठाकरे, आमदार

logo
marathi.freepressjournal.in