पीओपीच्या गणेशमुर्ती बनवण्याची परवानगी मिळावी, समन्वय समितीची पालिकेकडे मागणी

गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती उत्सवांत पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याबाबत टप्प्याटप्प्याने कार्यवाही होत आहे
पीओपीच्या गणेशमुर्ती बनवण्याची परवानगी मिळावी, समन्वय समितीची पालिकेकडे मागणी

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत पीओपीच्या गणेशमुर्ती बनवण्याची परवानगी द्या, अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने पालिकेकडे केली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे २०२० मध्ये ‘पीओपी’च्या मूर्तींवर बंदी घालण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती उत्सवांत पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याबाबत टप्प्याटप्प्याने कार्यवाही होत आहे. तसेच ‘पीओपी’मधील घातक घटकांशिवाय मूर्ती बनवता येऊ शकते का याबाबत सेंट्रल सायंटिफिक कमिटीकडे विचारणा केल्यानंतर मूर्तींना पर्यावणस्नेही रंग देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शिवाय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमधील काही मुद्द्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे पालिकेने यावर्षी ‘पीओपी’च्या मूर्ती बनवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी गणेशोत्सव समन्वय समितीने पालिकेकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in