मराठी अभिनेत्री केतकी चितळेचे अटकेला आव्हान, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात केतकीविरुद्ध १४ मे २०२२ रोजी बदनामीचा गुन्हा दाखल केला होता.
मराठी अभिनेत्री केतकी चितळेचे अटकेला आव्हान, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

अभिनेत्री केतकी चितळे ही तीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. पण सध्या तिने राष्ट्रवादी कॅंाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटक केली. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात केतकीविरुद्ध १४ मे २०२२ रोजी बदनामीचा गुन्हा दाखल केला होता. कळंबोली येथून तिला अटक करण्यात आली होती.

ही अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत केतकीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी तिने तिचे गुन्हा रद्द करण्याच्या मागणीवरुन याचिका दाखल केली असून ती अजुन प्रलंबित आहे. आधीच्या याचिकेत केतकीने जामिनावर सुटका करण्याची मागणी देखील केली होती. नव्या याचिकेत कळवा पोलिसांनी केलेली अटक बेकायदा ठरवण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाने अटक करण्याबाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचा दावाही केतकी चितळेने केला आहे.

बदनामी करणे, धर्म आणि वंशाच्या आधारे विविध समाजांमध्ये शत्रुत्व वाढवणे इत्यादी आरोप केतकी चितळेवर करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in