पिंडदान माशांसाठी जीवघेणी; बाणगंगा तलावात शेकडो मांस मृतावस्थेत

पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार, पालिका १२ कोटी रुपये खर्चणार
पिंडदान माशांसाठी जीवघेणी; बाणगंगा तलावात शेकडो मांस मृतावस्थेत

मुंबई : सर्वपित्री अमावास्येला मलबार हिल येथील बाणगंगा तलावात पिंडदान मोठ्या प्रमाणात करण्यात येते. पिंडदानात पिठाचे गोळे तलावात सोडण्यात आल्यानंतर शेकडो मासे मृत्यूमुखी पडल्याचे समजते. marathiदरम्यान, बाणगंगा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार असून यासाठी १२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मुंबईतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि सुमारे एक हजार वर्षांचा ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वैभवशाली इतिहास असलेला वाळकेश्वर येथील बाणगंगा परिसर आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाल्याची आख्यायिका आहे. रामाच्या जीवनातील प्रमुख दोन ते तीन प्रसंगांशी हा परिसर जोडला असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. पितृपक्षात बाणगंगेच्या काठी विविध धार्मिक विधी पार पाडले जातात. शनिवार १४ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावास्येला बाणगंगा तलावात मोठ्या प्रमाणात पिंडदान करण्यात आले. यावेळी निर्माण होणारे निर्माल्य, पिंड आणि इतर साहित्य थेट तलावात टाकले जाते.परिणामी तलावातील मासे ते खात असल्याने आणि हानिकारक पदार्थांशी संपर्क येत असल्याने त्यांचा मृत्यू होतो.

ऑक्सिजनच्या प्रमाणात घट!

तलावाचे पाणी स्थिर असल्यामुळे हे साहित्य वाहून जात नाही. त्यामुळे पाणी प्रदूषित होते. विसर्जित करण्यात येणार्‍या विविध पदार्थांमुळे पाण्यावर तेलाचे तवंग तयार होतात. यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने माशांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावर प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in