मुंबईतील सिप्झ-सेझ येथील मानक डिझाईन कारखान्याचे काम प्रगतीपथावर,पीयूष गोयल यांनी घेतला आढावा

महा-सामायिक सुविधा केंद्राकरिता ८२ कोटी रुपयांचा निधी – हे केंद्र म्हणजे व्यापारी आस्थापना नसून सामाजिक प्रकल्प आहे
मुंबईतील सिप्झ-सेझ येथील मानक डिझाईन कारखान्याचे काम प्रगतीपथावर,पीयूष गोयल यांनी घेतला आढावा

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईतील सिप्झ-सेझ परिसराला भेट देऊन तेथे सुरु असलेल्या मेगा सीएफसी अर्थात महा-सामायिक सुविधा केंद्र तसेच एसडीएफ अर्थात मानक डिझाईन कारखाने (एसडीएफ-९ आणि एसडीएफ-१०) यांच्या उभारणी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. सिप्झ-सेझचे विकास आयुक्त श्याम जगन्नाथन आणि सह विकास आयुक्त सीपीएस चौहान यांनी यावेळी या प्रकल्पांच्या कामाच्या सद्यस्थितीबाबत केंद्रीय मंत्र्यांना माहिती दिली.

महा-सामायिक सुविधा केंद्राकरिता ८२ कोटी रुपयांचा निधी – हे केंद्र म्हणजे व्यापारी आस्थापना नसून सामाजिक प्रकल्प आहे. मौल्यवान रत्ने आणि दागिने यांचे आरेखन आणि निर्मिती करण्यास पाठबळ पुरविणे हे मेगा सीएफसी चे उद्दिष्ट आहे. या केंद्रामुळे रत्ने आणि दागिने निर्मिती कामाचा सध्याचा दर्जा, उत्पादकता, मनुष्यबळाचे कौशल्य, देशांतर्गत संशोधन आणि विकास कार्य, तंत्रज्ञानासंदर्भातील आधुनिकता आणि किमतीच्या बाबतीतील स्पर्धात्मकता यांच्यात सुधारणा होईल. या केंद्रामध्ये कौशल्यविकास अभ्यासक्रमात सहभागी होण्याच्या तसेच या उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण केंद्राचा देखील समावेश करण्यात आला आहे.

मेगा सीएफसी केंद्राला संकल्पनेतून निर्मिती अवस्थेत आणण्यासाठीचा एकूण खर्च करण्यासाठी ८२ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हे केंद्र १ मे २०२३पर्यंत कार्यान्वित करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. लघु आणि मध्यम उद्योगांसह दागिने प्रक्रिया केंद्रांची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने मेगा सीएफसी केंद्राच्या निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. अनेक सामायिक सुविधांसाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज असल्यामुळे या क्षेत्रातील उद्योगांना स्वतंत्रपणे या सुविधा उपलब्ध करून देता येत नाहीत, त्या सुविधा या केंद्रामध्ये उपलब्ध असतील. हे मेगा सीएफसी केंद्र मन्जे व्यापारी आस्थापना नसून सामाजिक प्रकल्प असणार आहे. एसडीएफ-I मधील कारखाने एसडीएफ-९ आणि एसडीएफ-१०मध्ये स्थलांतरित करण्यासाठी सिप्झ-सेझ मध्ये दोन नवे एसडीएफ उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. एसडीएफ-I मधील इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकके एसडीएफ-९ तर एसडीएफ-I मधील मौल्यवान रत्ने आणि दागिने यांचे कारखाने एसडीएफ-१० मध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. हे दोन नवे एसडीएफ या उद्योगांना आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा पुरवू शकतील. सिप्झ-सेझ परिसराचा कायापालट करण्याची सुरुवात या दोन नव्या एसडीएफ च्या उभारणीने होईल. सध्या सुरु असलेल्या कारखान्यांचे नव्या जागी स्थलांतर केल्यानंतर ४७ वर्ष जुनी इमारत पाडण्यात येईल अनि त्या जागी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. ही प्रक्रिया पुढील एसडीएफसाठी देखील अशाच पद्धतीने सुरु राहील.

logo
marathi.freepressjournal.in