नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यामध्ये फारसा फरक नाही. पण गेल्या पाच वर्षात माजी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि वृक्षारोपणाचे नियोजन केले आहे. तेच नियोजन करण्याची गरज सोलापूर विद्यापीठाला पण आहे. त्यामुळे नांदेड विद्यापीठाच्या धर्तीवर सोलापूर विद्यापीठाचे नियोजन करणार आहे, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू तथा नांदेड विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर सोमवारी (दि. ६) विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये कार्यभार स्वीकारताना आपले मनोगत व्यक्त करत होते.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, प्र. वित्त व लेखाअधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. संतराम मुंडे, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सुरेखा भोसले, डॉ. माधुरी देशपांडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा विभागाचे प्र. संचालक डॉ. मनोज रेड्डी यांची उपस्थिती होती.