पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना सुखद धक्का; १० लोकल १५ डब्ब्यांच्या होणार, १ ऑक्टोबरपासून १२ नवीन लोकल सुरू होणार

अतिरिक्त रेल्वे मार्गिकेच्या कामामुळे गणेशोत्सवापूर्वीच कोलमडलेल्या वेळापत्रकाचा सामना कराव्या लागणा-या मुंबईकरांना पश्चिम रेल्वेने सुखद धक्का दिला आहे.
पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना सुखद धक्का; १० लोकल १५ डब्ब्यांच्या होणार, १ ऑक्टोबरपासून १२ नवीन लोकल सुरू होणार
Published on

मुंबई : अतिरिक्त रेल्वे मार्गिकेच्या कामामुळे गणेशोत्सवापूर्वीच कोलमडलेल्या वेळापत्रकाचा सामना कराव्या लागणा-या मुंबईकरांना पश्चिम रेल्वेने सुखद धक्का दिला आहे. दरम्यान, या वृत्ताला पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

वर्दळीच्या पश्चिम रेल्वे मार्गावर १२ नवीन लोकल व १० अद्ययावत गाड्या येत्या १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. या महत्त्वपूर्ण बदलामध्ये सीएसएमटी-बोरिवली ही हार्बर मार्गावरून तर चर्चगेट-विरार मार्गावर एक लोकल फेरी पश्चिम रेल्वेचा मुंबई विभागातर्फे १ ऑक्टोबरपासून नवीन रेल्वे फेऱ्या देण्यासाठी सज्ज झाला आहे. विभागामार्फत १२ नवीन रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर दैनंदिन फेऱ्या सध्याच्या १,३९४ वरून १,४०६ पर्यंत वाढतील . याव्यतिरिक्त, १२ डब्ब्यांच्या १० विद्यमान लोकल १५ डब्ब्यांच्या चालविण्यात येतील, असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. १२ नवीन लोकल फेऱ्यांमध्ये सहा लोकलचा विस्तार केला जाणार आहे. प्रत्येक दिशेने ३ आणि १६ इतर सेवांमध्ये बदल होतील. काही लोकल धीम्या मार्गावरून जलद सेवांमध्ये बदलण्यात येणार आहेत. वेळापत्रकातील सुधारणा या भारतीय रेल्वेच्या वार्षिक अद्यवततेचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येते. रेल्वे मंडळ दरवर्षी, ऑक्टोबरमध्ये नवे वेळापत्रक लागू करते. यावर्षी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांचेही समायोजन येत्या जानेवारीपर्यंत पुढे ढकलले जाईल. पश्चिम रेल्वेची बोरिवली ते विरार पाचवी व सहावी मार्गिका तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी रेल्वेने ३५ दिवसांचा ब्लॅकही जाहीर केला होता. मात्र गणेशोत्सवा दरम्यान मुंबईकर भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून तो लांबणीवर मेगा ब्लॅक टाकण्यात आला होता.

अशा असतील १२ लोकल

  • दादर आणि विरार दरम्यान – ४

  • विरार आणि चर्चगेट दरम्यान – १

  • बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान – १

  • चर्चगेट आणि अंधेरी दरम्यान - २

  • चर्चगेट आणि गोरेगाव दरम्यान - ३

  • चर्चगेट आणि नालासोपारा दरम्यान - १

logo
marathi.freepressjournal.in