कंत्राटी चालकांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल

बेस्ट उपक्रमाद्वारे दररोज बस गाड्या चालविल्या जात असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने दिली
कंत्राटी चालकांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल

वेतन वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटी चालकांनी रविवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारीही काम बंद आंदोलन सुरू असल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, बेस्ट प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. कंत्राटातील अटीनुसार संबंधित कंत्राटदार व्यवसाय संस्थेवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता बेस्ट उपक्रमाद्वारे दररोज बस गाड्या चालविल्या जात असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने दिली.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाडेतत्त्वावर वातानुकूलित, मिडी व १२ मीटर लांब बसेस घेतल्या आहेत. या भाडेतत्त्वावरील बसेस कंत्राटदाराच्या माध्यमातून चालवण्यात येतात. बसचालकांचे वेतन देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असेल, असे बेस्ट उपक्रमाने याआधीच स्पष्ट केले आहे; मात्र कंत्राटदार वेळेवर वेतन देत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यावेळी कंत्राटदाराने आश्वासन दिल्यानंतर काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले होते; मात्र दोन महिन्यांनंतर पुन्हा वेतन वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा चालकांनी घेतल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in