राजावाडी रुग्णालयातील रुग्णांचे हाल ; काय आहेत नेमक्या समस्या ?

रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे हाल होत असून गरोदर स्त्रियांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, याची गंभीर दखल...
राजावाडी रुग्णालयातील रुग्णांचे हाल ;  काय आहेत नेमक्या समस्या ?

घाटकोपर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात सध्या ‘एमआरआय’, ‘सीटीस्कॅन’ बंद असून ‘आयसीयू’मध्ये बेडची कमतरता आहे. यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे हाल होत असून गरोदर स्त्रियांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याची गंभीर दखल शिव आरोग्य सेनेने रुग्णालय प्रशासनाला भेट देत तातडीने गैरसोयी दूर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्वसामान्यांच्या आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी शिव आरोग्य सेनेची स्थापना करण्यात आली आहे. शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून राज्यभरात गोरगरीबांना अहोरात्र आरोग्य विषयक मदत केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील गैरसोयी दूर करण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे करण्यात आली. शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा डॉ. शुभा राऊळ, कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सुचनेनुसार रविवारी महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांनी शिष्टमंडळासह रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. भारती राजुलवाला व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पैयनवार यांची भेट रुग्णालयातील गैरसोयी दूर करण्याची मागणी केली.

या आहेत समस्या

* रुग्णालयात सीटी स्कॅन, एम.आर.आय मशीन उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना शताब्दी किंवा शिव रुग्णालयात टेस्टसाठी जावे लागते. आयसीयू विभाग चालू केला आहे, परंतु त्या विभागात बेडची कमतरता आहे.

* अपघात विभागाकडे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शौचालय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न व्हावा जेणे करून राजावाडी परिसरात अस्वच्छता होणार नाही.

* हॉस्पिटलमध्ये डॉक्टर स्टाफची कमतरता जाणवते व न्युरो सर्जन असणे आवश्यक आहे. जास्त प्रमाणात अपंग रुग्ण हॉस्पिटलमध्ये येत असताना त्यांच्यासाठी स्वतंत्री ओपीडी नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in