पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे हाल सुरुच ;आज २३३ लोकल रद्द, ८३ लोकल प्रवासी सेवेत

प्रवाशांना दिलासा देत गैरसोय टाळण्यासाठी सोमवार ३० ऑक्टोबर रोजी रद्द केलेल्या पैकी ६८ लोकल पूर्ववत सुरू करण्यात आल्या.
पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे हाल सुरुच ;आज २३३ लोकल रद्द, ८३ लोकल प्रवासी सेवेत
ANI

मुंबई : खार-गोरेगाव स्थानकादरम्यान सहाव्या लेनचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेने जम्बोब्लॉक घेतला आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत हे काम सुरू राहणार असून मंगळवारी ३१६ पैकी २३३ लोकल रद्द करण्यात आल्या आहेत व तर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मंगळवारी ८३ लोकल प्रवासी सेवेत धावतील, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

खार आणि गोरेगाव स्थानकादरम्यान सहाव्या मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचा पश्चिम रेल्वेचा प्रयत्न आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी लोकल चालवण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी जाहीर केल्यानुसार रद्द करण्यात आलेल्या लोकलपैकी जास्तीत जास्त चालवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रवाशांना दिलासा देत गैरसोय टाळण्यासाठी सोमवार ३० ऑक्टोबर रोजी रद्द केलेल्या पैकी ६८ लोकल पूर्ववत सुरू करण्यात आल्या. याआधी घोषित केल्याप्रमाणे ३१६ पैकी केवळ २४८ लोकल सोमवारी रद्द करण्यात आल्या. तर उद्या मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी ८३ लोकल चालवण्यात येतील. याआधी घोषित केल्यानुसार ३१६ पैकी २३३ लोकल मंगळवारी रद्द केल्या जातील, असे पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in