वांद्रे येथील भूखंड क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला; सुनील गावस्कर यांनी नाकारलेला भूखंड देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

वांदे रिक्लेमेशन येथील दोन हजार चौरस मीटरचा भूखंड क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली आहे.
वांद्रे येथील भूखंड क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला; सुनील गावस्कर यांनी नाकारलेला भूखंड देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
Published on

मुंबई : वांदे रिक्लेमेशन येथील दोन हजार चौरस मीटरचा भूखंड क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली आहे. या भूखंडावर क्रीडा संकुल उभारणीसाठी ही जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ही जागा १९८८ मध्ये लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांना दिली होती. मात्र त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम न झाल्याने त्या ठिकाणी अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे रहाणे यांना भूखंड देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

वांद्रे रिक्लमेशन येथील दोन हजार चौरस मीटरचा भूखंड हा रहाणे यांना ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येईल. यापूर्वी हा भूखंड क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना इन्डोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी १९८८ मध्ये वितरीत करण्यात आला होता. मात्र या भूखंडावर कोणतेही काम न झाल्याने शासनाने तो परत घेतला आहे. या भूखंडाची सद्याची परिस्थिती वाईट असून, आसपासचे झोपडीधारक अनावश्यक कामांसाठी याचा वापर करत आहेत. त्यानंतर म्हाडा प्राधिकरणाने ठराव करून हा भूखंड माजी कर्णधार अजिंक्य मधुकर रहाणे यांना देण्याची शिफारस केली.

logo
marathi.freepressjournal.in