

मुंबई : पर्यटन मंत्री शंभूराज देसाई पर्यटन विभागाच्यावतीने यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व २०२६ च्या निमित्ताने आयोजित उपक्रमात महाराष्ट्राचे विशेष पर्यटन दालन उभारण्यात आले आहे. या दालनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. यावेळी पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव आणि त्यांच्या टीमने पंतप्रधानांचे स्वागत केले.
पंतप्रधानांनी भेटीदरम्यान पैठणी विणकामामागील कलाकुसर, पारंपरिक तंत्र, त्यातील बारकावे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रपरंपरेची माहिती जाणून घेतली. १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या उपक्रमात महाराष्ट्र पर्यटन विभाग सहभागी होत आहे.
दालनात काय आहे ?
पैठणीबरोबर खाद्यसंस्कृती, हस्तकलेच्या वस्तू ही दालनाची प्रमुख आकर्षणे आहेत. इन्स्टिट्यूट करण्यात येत आहे. गड-किल्ले, ऑफ हॉटेल मॅनेजमेंट समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, (आयएचएम), दादर येथील निसर्गरम्य पर्यटनस्थळे, साहसी किचन स्टुडिओच्या माध्यमातून पर्यटन, सांस्कृतिक परंपरेची खाद्यसंस्कृतीचेही सादरीकरण माहिती दालनात देण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक ओळखीचा, ऐतिहासिक वारशाचा, वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपरंपरेचा आणि पर्यटन क्षेत्रातील विविध संधींचा देशभरातील पर्यटकांसमोर प्रभावीपणे परिचय करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
संजय यादव, सचिव, पर्यटन विभाग
पंतप्रधानांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाला राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक प्रसिद्धी मिळण्यासोबतच राज्यातील पर्यटनस्थळांकडे देशभरातील पर्यटकांचे लक्ष वेधले जाण्यास आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.
विकास पानसरे, संचालक, पर्यटन संचालनालय