विकसित मुंबई ते विकसित भारत; राहुल शेवाळे यांची निर्धार मेळाव्यात घोषणा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात माहीम येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या निर्धार मेळाव्यात बोलताना उमेदवार राहुल शेवाळे यांनी मुंबई विकास आराखडा २०२४ च्या अंमलबजावणीची आवश्यकता यावर प्रकाश टाकला.
विकसित मुंबई ते विकसित भारत; राहुल शेवाळे यांची निर्धार मेळाव्यात घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मुंबईच्या विकास आराखड्याची संपूर्ण अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. म्हणूनच विकसित मुंबई ते विकसित भारत ही घोषणा महायुतीचे मुंबई दक्षिण-मध्यचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी केली. रविवारी दुपारी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात माहीम येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या निर्धार मेळाव्यात बोलताना उमेदवार राहुल शेवाळे यांनी मुंबई विकास आराखडा २०२४ च्या अंमलबजावणीची आवश्यकता यावर प्रकाश टाकला. तसेच विकसित भारतासाठी विकसित मुंबईचे योगदान विषद केले. आमदार प्रसाद लाड यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह घराघरात पोहोचविण्याचे आवाहन केले. सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या उदंड प्रतिसादात महायुतीचा निर्धार मेळावा यशस्वीपणे पार पडला.

यावेळी आमदार सदा सरवणकर, आमदार प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, शिवसेना विभाप्रमुख निशिकांत पाठारे, महिला विभागप्रमुख प्रिया गुरव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय डोळसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, भाजप विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर, आरपीआय युवा अध्यक्ष सचिन मोहिते, माजी नगरसेवक समाधान सरवणकर, अमेय घोले, शीतल गंभीर, अन्य मान्यवर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in