पी.एम.जी.पी पुनर्वसन प्रकल्प महिनाभरात प्रकल्प मार्गी लागणार

संजीव जयस्वाल यांचे आश्‍वासन
पी.एम.जी.पी पुनर्वसन प्रकल्प महिनाभरात प्रकल्प मार्गी लागणार

मुंबई : गेली अनेक १५ वर्षे रखडलेल्या जोगेश्‍वरी (पुर्व) पुनमनगर येथील पी.एम.जी.पी पुनर्वसन प्रकल्पातील अडथळे दूर करून प्रकल्प महिन्याभरात मार्गी लावण्यात येईल, असे आश्‍वासन म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल यांनी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांना बैठकीत दिले.

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात पी.एम.जी.पीच्या एकुण १७ इमारती असून, यात सुमारे ९८२ सदनिकाधारक वास्तव्य करीत आहेत. या सर्व इमारती धोकादायक स्थितीत असल्याने या इमारतींमध्ये सद्यस्थिती जीव मुठीत धरून राहणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळावा, यासाठी वायकर यांनी विधानसभेतील विविध आयुधांच्या माध्यमातून या गंभीर प्रश्‍नाकडे शासनाचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री, सचिव, म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, यांच्या समवेत बैठकाही घेतल्या तसेच पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीटही करण्यात आले असून, त्याचा अहवालही म्हाडाकडे पाठविण्यात आला आहे. या इमारती दुरुस्तीच्या पलिकडे गेल्याने त्या पाडण्यात याव्यात, असे अहवालात नमुद केले आहे. परंतु याप्रश्‍नी कुठलीच ठोस पावले म्हाडाकडून उचण्यात न आल्याने आमदार वायकर यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली होती. या बैठकीला माजी नगरसेवक बाळा नर, उपविभागप्रमुख कैलाशनाथ पाठक, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, शाखाप्रमुख नंदु ताम्हणकर, एम.एम.आर.डीचे रहिवासी, म्हाडाच्या संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in