पोक्सो गुन्हेगाराची जन्मठेप रद्द

पोक्सोच्या गंभीर गुन्ह्यातील सरकारी पक्षाचे अपयश अधोरेखित करून उच्च न्यायालयाने आरोपीच्या जन्मठेपेच्या शिक्षेत मोठी कपात केली. न्यायालयाने आरोपीची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आणि ती शिक्षा १२ वर्षे कठोर कारावासात रुपांतरीत केली.
पोक्सो गुन्हेगाराची जन्मठेप रद्द
पोक्सो गुन्हेगाराची जन्मठेप रद्दसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई: पोक्सोच्या गंभीर गुन्ह्यातील सरकारी पक्षाचे अपयश अधोरेखित करून उच्च न्यायालयाने आरोपीच्या जन्मठेपेच्या शिक्षेत मोठी कपात केली. न्यायालयाने आरोपीची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली आणि ती शिक्षा १२ वर्षे कठोर कारावासात रुपांतरीत केली. न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला.

खंडपीठाने सरकारी पक्षाच्या अपयशावर ताशेरेही ओढले. पॉक्सो कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ४७ वर्षीय विजय रमेश दंतानी या आरोपीने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिर्घ सुनावणी घेतली. विजय दंतानी याला २०१७ मध्ये विशेष पॉक्सो न्यायालयाने ११ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

हा गुन्हा ऑक्टोबर २०१४ मध्ये माहिम येथील टी. एच. कटारिया रोडवरील फूटपाथवर घडला होता. तिथे पीडितेचे कुटुंब राहत होते. विशेष न्यायालयाने आरोपीला पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in