पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थाचा मृत्यू, विद्यार्थ्यांनी केले आंदोलन; नेमकं प्रकरण काय?

पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा झाडावरून पडून मृत्यू झाला. त्यानंतर उपचार वेळेत न मिळाल्याचे आरोप करत इतर विद्यार्थ्यांनी केले आंदोलन
पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थाचा मृत्यू, विद्यार्थ्यांनी केले आंदोलन; नेमकं प्रकरण काय?
Published on

आज मुंबईतील पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात शिकणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थ्याचा झाडावरून पडून मृत्यू झाला. हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्या विद्यार्थाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत अन्य विद्यार्थ्यांनी केला. याच प्रकरणी जाब विचारात त्यांनी रुग्णालयातील ओपीडी सेवा बंद केली. तसेच, रुग्णालयातील प्रशासनाविरोधात त्यांनी निदर्शने केली.

मुंबईतील वरळी येथील पोद्दार आयुर्वेद रुग्णालयात बीएएमएसला शिकणाऱ्या २२ वर्षीय दयानंद काळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. रात्री आंब्याच्या झाडावरून पडून दयानंद काळेच्या डोक्याला दुखापत झाली. यावेळी त्याला पोद्दार आयुर्वेद रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयातील सेवा अभावी आणि तेथील प्रशासनाने तत्परता दाखवली नसल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याच्या सोबत शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यांचे म्हणणे आहे की, जखमी विद्यार्थ्यासाठी रुग्णालयातील प्रशासन साधी ऍम्ब्युलन्सही उपलब्ध करू शकले नाहीत. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्या विद्यार्थ्याचा बळी गेला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in