गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज! हजारोंचा फौजफाटा तैनात

मुस्लिम संघटना आणि धार्मिक नेत्यांनी अनंत चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलादची मिरवणूक गुरुवारऐवजी शुक्रवारी काढण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज! हजारोंचा फौजफाटा तैनात

आज अनंत चतुर्थी असल्याने गेल्या दहा दिवस राज्यभरात उत्साहात सुरु असलेला गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. महाराष्ट्राच्या या महाउत्सवाची तयारी आज सर्वत्र केली जात आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज अनंत चतुर्थीला गणरायाच्या विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून वाहतूकी संदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर काही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहे. गणपीत मिरवणूकीच्या पार्श्वभूमिवर मुंबईत 19,000 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्याचा फौजफाटा जागोजागी तैनात करण्यात येणार आहे. तसंच ईद-ए-मिलादसाठी देखील याच प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. ईद-ए-मिलाद निमित्तजची मिरणूक शुक्रवारी काढण्यात येणार आहे.

आज (२८ सप्टेंबर) गणेशविसर्जनाच्या पार्श्वभूमिवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) १,३३७ जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत, त्यापैकी काही जीवनरक्षक नैसर्गिक जलाशयांवर तैनात केले आहेत. तर ३०२ जीवरक्षक कृत्रिम तलावांवर तैनात केले जातील असं सांगण्यात आलं आहे. BMCने नैसर्गिक विसर्जनाच्या ठिकाणी ५३ मोटरबोटी तैनात केल्या आहेत. त्याच बरोबर आज अनंत चतुर्थी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आल्याने अनेक मुस्लिम संघटना आणि धार्मिक नेत्यांनी अनंत चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर ईद-ए-मिलादची मिरवणूक गुरुवारऐवजी शुक्रवारी काढण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये १६,२५० हवालदार, २,८६६ अधिकारी, ४५ सहायक पोलिस आयुक्त, २५ पोलिस उपायुक्त, ८ अतिरिक्त पोलिस आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याच बरोबर राज्य राखीव पोलीस दलाच्या ३५ प्लाटून, क्विक अॅक्शन फोर्सची एक कंपनी, क्विक रिअॅक्शन फोर्स तसेच होमगार्डचे जवान देखील महत्त्वाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in