पोलीस भरतीला लागली 'उत्तेजक औषधां'ची वाळवी; नेमकं प्रकरण काय?

राज्यभर पोलीस भरतीसाठी सुरुवात झाली असून गेल्या २ दिवसांमध्ये उत्तेजक पदार्थ सापडल्याने अनेकांवर कारवाई
पोलीस भरतीला लागली 'उत्तेजक औषधां'ची वाळवी; नेमकं प्रकरण काय?
Published on

गेले अनेक दिवस प्रलंबित असलेली पोलीस भरतीची प्रक्रिया अखेर सुरु झालेली आहे. अशामध्ये आता राज्यात अनेक जिल्ह्यांमधून उत्तेजक पदार्थ घेतल्याप्रकरणी कारवाई केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आधी नांदेडमध्ये एका उमेदवाराजवळ उत्तेजित करणारे औषधे आणि इंजेक्शन आढळून आले. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. तर, नांदेडनंतर रायगडमधील पोलीस भरतीदरम्यान २ जणांवर उत्तेजक सापडल्याने कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग पोलिसांना एका कॉटेजमध्ये थांबलेल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या तरुणांकडे औषधी द्रव्ये असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांच्याकडे काही उत्तेजक पदार्थ सापडले. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबई व नवी मुंबई येथे पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच, पालघरमध्येही एका उमेदवाराची संशयावरून पोलिसांनी झाडाझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे ऑक्सिबूस्टर हे शक्तीवर्धक औषध आणि रिकामे इंजेक्शन आढळून आले. यामुळे पोलीस भरती प्रक्रियेसाठी त्याला अपात्र ठरवण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in