गणेशोत्सवात पोलीस ऑनड्यूटी २४ तास

गणेशोत्सवात गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी मारामारी, गोंधळ घातल्यास कडक कारवाई केली जाईल हा मागील उद्देश आहे.
गणेशोत्सवात पोलीस ऑनड्यूटी २४ तास

डोंबिवली : गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठी सोमवारी डोंबिवलीत पोलिसांचा रुट मार्च काढण्यात आला होता. मारामारी व लूटमार होत असलेल्या शेलार नाका येथून रुट मार्चला सुरुवात होऊन पुढे चार रस्तावरून कोपर पुलावरून डोंबिवली पश्चिमेकडील कोपर रोड, सम्राट चौक, बावन चाळ पुन्हा डोंबिवली रामनगर पोलीस ठाणे येथे रुट मार्च समाप्ती करण्यात आला. कल्याण नंतर डोंबिवलीत पोलिसांनी काढलेल्या रुट मार्च पाहण्यासाठी नागरिक जमा झाले होते. गणेशोत्सवात गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी मारामारी, गोंधळ घातल्यास कडक कारवाई केली जाईल हा मागील उद्देश आहे.

शहापूर : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या शहापूर शहरात पोलीस निरीक्षक अनंत पराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा लॉंगमार्च काढण्यात आला, तर वसिंद शहरात पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांनी गणेशोत्सव व ईद मिलादच्या धर्तीवर हिंदू व मुस्लिम धर्मियांची समन्वय बैठक घेण्यात आली. शहापूर पोलिस ठाण्याचे सर्व अधिकारी , कर्मचारी यांनी सहभाग घेत शहरातील मुख्य बाजारपेठेतुन फेरफटका मारत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन जनतेला करित गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in