Mira-Bhayandar : पोलिसांनी थकविली ११ कोटींची थकबाकी; जप्त वाहने ठेवण्यासाठी दिली होती जागा

मीरा-भाईंदर, वसई विरार पोलिसांनी मीरा-भाईंदर महापालिकेच्या इमारती, कार्यालये आणि जप्त वाहने ठेवण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या मोकळ्या मैदानांच्या जागांच्या भाड्यापोटी पोलीस आयुक्तालयाकडे तब्बल ११ कोटी २८ लाख ७७ हजार रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे.
Mira-Bhayandar : पोलिसांनी थकविली ११ कोटींची थकबाकी; जप्त वाहने ठेवण्यासाठी दिली होती जागा
Mira-Bhayandar : पोलिसांनी थकविली ११ कोटींची थकबाकी; जप्त वाहने ठेवण्यासाठी दिली होती जागा(संग्रहित छायाचित्र)
Published on: 

भाईंंदर : मीरा-भाईंदर, वसई विरार पोलिसांनी मीरा-भाईंदर महापालिकेच्या इमारती, कार्यालये आणि जप्त वाहने ठेवण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या मोकळ्या मैदानांच्या जागांच्या भाड्यापोटी पोलीस आयुक्तालयाकडे तब्बल ११ कोटी २८ लाख ७७ हजार रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे.

दुसरीकडे, अतिक्रमण हटविणे, फेरीवाल्यांवरील कारवाई, निवडणुका आणि अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनासाठी पुरविलेल्या पोलीस बंदोबस्तापोटी पोलिसांनी महापालिकेकडे ५ कोटी २० लाख ६६ हजार रुपयांची मागणी केली आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे वैधानिक कर्तव्य असल्याचे नमूद करत महापालिका प्रशासनाने ही मागणी फेटाळण्याची भूमिका घेतली आहे. या परस्पर आर्थिक व्यवहारांसह विविध मागण्यांबाबतचा प्रस्ताव आता महासभेसमोर सादर करण्यात आला आहे.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. त्या वेळी पोलीस आयुक्तालय, पोलीस ठाणी आणि चौक्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने महापालिकेने स्वतःच्या ताब्यातील इमारती आणि मोकळ्या जागा भाडेतत्त्वावर दिल्या होत्या. जप्त वाहने ठेवण्यासाठीही विविध ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तर महापालिकेच्या प्रस्तावानुसार, पोलीस कार्यालये व पोलीस ठाण्यांसाठी दिलेल्या इमारतींच्या भाड्यापोटी ३ कोटी ३५ लाख ३६ हजार रुपये थकीत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in