पोलिस कर्मचाऱ्यांना नवीन सरकारने दिले गणेशोत्सवाचे मोठे गिफ्ट

मविआ सरकारच्या काळात ही योजना बंद केली होती. मात्र, ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला
पोलिस कर्मचाऱ्यांना नवीन सरकारने दिले 
गणेशोत्सवाचे मोठे गिफ्ट
Published on

राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने गणेशोत्सवाचे मोठे गिफ्ट दिले आहे. डीजी लोन योजनेअंतर्गत कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना गृह विभागाकडूनच २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येणार आहे. मविआ सरकारच्या काळात ही योजना बंद केली होती. मात्र, ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत माहिती देताना सांगितले की, डीजी लोन योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच पोलिसांना १५ लाख रुपयांत मुंबईत घर उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता विभागांतर्गत कर्जाची सुविधा उपलब्ध झाल्याने पोलिसांमध्ये समाधानाची भावना आहे.

logo
marathi.freepressjournal.in