मुंबईतील डान्स बारना पोलिसांचे संरक्षण; बारमालकांचे सिंडिकेट -विजय वडेट्टीवार

बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून, सिंडिकेटमधील बारचालक महिन्याला लाखो रुपये जमा करीत आहेत.
मुंबईतील डान्स बारना पोलिसांचे संरक्षण; बारमालकांचे सिंडिकेट -विजय वडेट्टीवार

मुंबई : मुंबईत ऑर्केस्ट्राच्या आड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाच वाजेपर्यंत डान्स बार सुरू आहेत. मुंबईतील या डान्स बारना पोलिसांचेच संरक्षण आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी केला. या डान्स बारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून, सिंडिकेटमधील बारचालक महिन्याला लाखो रुपये जमा करीत आहेत. जमा झालेल्या रकमेतून पोलिसांना, पोलिसांच्या खबऱ्यांना, स्थानिक गुंडांना हप्ते दिले जात आहेत. त्यामुळे सिंडिकेटमधील डान्स बारवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. डान्स बार पहाटेपर्यंत चालू आहेत. याबाबत स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार देऊन देखील डान्सबारवर कोणतीही कारवाई केली जात नाही. याउलट सिंडिकेटमधील बारचालक तक्रारदारालाच धमक्या देत आहेत, मारहाण करीत आहेत. यासंदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील ऑर्केस्ट्राच्या आड सुरू असलेल्या डान्स बारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in