मुख्यमंत्र्याच्या निवासाबाहेर पोलिसांचा पहारा वाढला ; रस्ता केला बंद...

शहरातील अनेक राजकीय निवासाबाहेर देखील पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे
मुख्यमंत्र्याच्या निवासाबाहेर पोलिसांचा पहारा वाढला ; रस्ता केला बंद...

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाचं पेटला आहे. सगळीकडे आंदोलक जाळफोड ,तोडफोड करत आहेत. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणुन लोकं संपूर्ण राज्यभरात मोर्चे, प्रचार करत आहेत. आता आंदोलकांनी या आरक्षणासाठी हिंसक रूपं धारणं केलं आहे. आंदोलकांनी काही आमदारांच्या घराची आणि कार्यालयाची जाळफोड केली आहे.

आंदोलनाच्या या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासबाहेर पोलिसांचा पहारा वाढवला आहे. तसेच शहरातील अनेक राजकीय निवासाबाहेर देखील पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरील रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. नागरिकांना वळसा घेऊन दुसरीकडून वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठया प्रमाणांत गैरसोय होतं आहे.

logo
marathi.freepressjournal.in