कुर्ला खून प्रकरणात पोलिसांना मोठ यश ; प्रियकरानेचं केला महिलेचा खून, प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

संबंधित महिला ही धारावी येथे राहणारी होती. चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने तिची हत्या केल्याचा संशय आहे
कुर्ला खून प्रकरणात पोलिसांना मोठ यश ; प्रियकरानेचं केला महिलेचा खून, प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतील कुर्ला परिसरात रविवारी रात्री एका सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. कुर्ला मेट्रोच्या बांधकाम साईटवर सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. संबंधित महिला ही धारावी येथे राहणारी होती. चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने तिची हत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी महिलेच्या प्रियकराला पोलिसांनी ताबोडतोब अटक केली आहे. हे दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते.

मुंबईच्या कुर्ला परिसरात सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला होता. अखेर आज त्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. रविवारी (19 नोव्हेंबर) कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सी.एस टी.रोड शांतीनगरच्या समोरील बाजूला मेट्रो रेल्वेच्या कामाच्या जागेवरील बॅरेकेटचे आतील बाजूस एका सुटकेसमध्ये महिलेच मृतदेह सापडला होता. चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याचा संशय पोलिसांन आहे. दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून सदर महिला ही धारावी परिसरातील राहणारी आहे. मुंबई गुन्हे शाखा कक्ष 5 ने महिलेच्या प्रियकराला पोलीस कस्टडीमध्ये घेतले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in