BMC Election: उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी पक्षांची चढाओढ

आगामी महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांचा कौल निर्णायक ठरणार असल्याने शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपली रणनीती या मतदारांभोवती केंद्रित केली आहे.
उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी पक्षांची चढाओढ
उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी पक्षांची चढाओढसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांचा कौल निर्णायक ठरणार असल्याने शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपली रणनीती या मतदारांभोवती केंद्रित केली आहे. एकूण मतदारसंख्येच्या अंदाजे १५ ते २५ टक्के असलेल्या या समुदायाचे संख्याबळ उत्तर आणि पूर्व उपनगरांतील अनेक प्रभागांत निकालाची दिशा ठरवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

भाजपकडून उत्तर भारतीय मतदारांशी पारंपरिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक उत्सव आणि स्थानिक संपर्क मोहिमांवर भर दिला जात आहे. ठाकरे सेना सर्वसमावेशक राजकारणाचा संदेश देत उत्तर भारतीय मतदारांशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तर कॉंग्रेसने मुस्लिम, दलित, उत्तर भारतीय मतदारांना केंद्रस्थानी ठेवत स्वतंत्र रणनीती आखली आहे.

निर्णायक विभाग

दहिसर-कांदिवली-मलाड

  • गोरेगाव-अंधेरी

  • कुर्ला-घाटकोपर

  • भांडुप-विक्रोळी-चेंबूर

यासाठी उत्तर भारतीय मतदार महत्त्वाचे

  • अनेक प्रभागांत मराठी, मुस्लिम मतांइतकेच संख्याबळ

  • निर्णायक लढतीत निकालाची दिशा बदलण्याची क्षमता

  • लोकसभेत निर्णायक भूमिका बजावल्याचा अनुभव

logo
marathi.freepressjournal.in