Mumbai : पीओपी गणेशमूर्तींना पूर्णपणे बंदी: मूर्तिकार न्यायालयात दाद मागणार

मुंबई महापालिकेने यंदाच्या उत्सवात पीओपी मूर्तींना पूर्णपणे बंदी घातली आहे. यासाठी पालिकेने नुकतेच नियमावली जाहीर केली आहे.
Mumbai : पीओपी गणेशमूर्तींना पूर्णपणे बंदी: मूर्तिकार न्यायालयात दाद मागणार
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेने यंदाच्या उत्सवात पीओपी मूर्तींना पूर्णपणे बंदी घातली आहे. यासाठी पालिकेने नुकतेच नियमावली जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर पीओपी मूर्तिकारांच्या संघटनेने न्यायालयात कैफियत मांडून न्याय मिळवण्याचे ठरवले आहे. या बंदीमुळे कित्येक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर २०२० मध्ये बंदी घातली होती. माघी गणेशोत्सवापासून १०० टक्के पीओपी बंदीचा निर्णय लागू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री होऊ देऊ नका, असे आदेश होते.

संघटनेचे म्हणणे...

गणेशोत्सवातही निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी पालिकेने नियोजन सुरू केले आहे. पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना यंदा मंडपासाठी परवानगी दिली जाणार आहे. मूर्तिकारांना यंदाही विनामूल्य शाडूची माती दिली जाणार आहे. उत्सवादरम्यान मूर्तीचे आगमन, विसर्जन सुकर होईल एवढ्या उंचीची मूर्ती घडवण्यात यावी, अशी अट परवानगीसाठी घालण्यात आली आहे. पीओपीच्या मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांवर परिणाम होणार आहे. त्यांची आर्थिक घडी विस्कळीत होणार असल्याचे सांगत पीओपी बंदीच्या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात दादा मागणार असल्याचे पीओपी मूर्तिकारांच्या संघटनेने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in