माघी गणेशोत्सवात पीओपी गणेशमूर्तींना बंदी; BMC ने जारी केली नियमावली

यंदाच्या माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे.
माघी गणेशोत्सवात पीओपी गणेशमूर्तींना बंदी; BMC ने जारी केली नियमावली
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : यंदाच्या माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे.  पीओपी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणार नाही, असे गणेशोत्सव मंडळांनी हमी पत्रात नमूद करावे, अशी अट घातली आहे. याबाबत पालिकेने सोमवारी नियमावली जारी केली आहे.

माघी गणेशोत्सव उत्सव १ फेब्रुवारीपासून साजरा करण्यात येणार आहे. यासाठी रस्त्यांवर व पदपथावर उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या मंडप परवानगीसाठी अर्जाची प्रक्रिया एक खिडकी योजनेद्वारे ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. मंडळांना मंडप उभारणी परवानगीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. 

प्राप्त अर्जांची छाननी करून वाहतूक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त होईल, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in