देवसहायम पिल्लई यांना व्हॅटिकनचे पोप फ्रान्सीस यांनी ‘संत’ पदवी केली बहाल

देवसहायम पिल्लई यांना व्हॅटिकनचे पोप फ्रान्सीस यांनी ‘संत’ पदवी केली बहाल
Published on

१८ व्या शतकात ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे हिंदू देवसहायम पिल्लई यांना जन्मानंतर ३०० वर्षांनी व्हॅटिकनचे पोप फ्रान्सीस यांनी ‘संत’ पदवी बहाल केली. ही पदवी मिळवणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहेत.

देवसहाय्यम पिल्लई यांचा जन्म २३ एप्रिल १७१२ मध्ये कन्याकुमारीच्या हिंदू नायर कुटुंबात झाला. त्यांचे वडील हिंदू मंदिरात पुजारी होते. देवसहाय्यम यांना संस्कृत, तमिळ व मल्याळम भाषा येत होत्या.

देवसहाय्यम बनले ख्रिश्चन

१७४१ मध्ये डच नेवी कमांडर युस्टाचियस डी लैनॉय हे त्रावणकोर राज्यावर चालून आले. त्रावणकोर सैन्याने डच कमांडरचा पराभव केला. त्याचवेळी डच कमांडर आणि देवसहाय्यम यांची भेट झाली. त्यावेळी डच कमांडरने देवसहाय्यम यांना ख्रिश्चन धर्माबाबत माहिती दिली. त्यानंतर १७४५ देवसहाय्यम यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यांचा बात्सीमा करण्यात आला. त्यानंतर त्यांचे नाव ‘लेजारूस’ ठेवण्यात आले.

गोळया घालून हत्या केली

त्रावणकोर राज्याचा या धर्मांतरणाच्या विरोधात होते. त्यांच्यावर राजद्रोह, हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आले. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. १४ जानेवारी १७५२ मध्ये त्यांना गोळ्या घालण्यात आल्या.

logo
marathi.freepressjournal.in