भारतीय शेअर बाजारात सकारात्मक उत्साह, दीर्घ कालावधीनंतर विदेशी गुंतवणूक सुरु

दिवसभरात तो ६८४.९६ अंकांनी वधारुन ५३,८१९.३१ ची कमाल पातळी गाठली होती.
भारतीय शेअर बाजारात सकारात्मक उत्साह, दीर्घ कालावधीनंतर विदेशी गुंतवणूक सुरु

विदेशी गुंतवणूक संस्थांनी दीर्घ कालावधीनंतर केलेली खरेदी आणि युरोपियन शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात उत्साह होता. बुधवारी सेन्सेक्सने ६१७ अंकांनी उसळी घेतली आणि निफ्टीही १ टक्का वधारला.

दिद ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ६१६.६२ अंक किंवा १.१६ टक्के उसळून ५३,७५०.९७ वर बंद झाला. दिवसभरात तो ६८४.९६ अंकांनी वधारुन ५३,८१९.३१ ची कमाल पातळी गाठली होती. त्यानंतर तो काही प्रमाणात घसरला. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी १७८.९५ किंवा १.१३ टक्के वधारुन १५,९८९.८० वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंटस‌्, टायटन, मारुती सुझुकी इंडिया, कोटक महिंद्रा बँक आणि नेस्ले यांच्या समभागात वाढ झाली. तर पॉवरग्रीड, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन ॲण्ड टुब्रो आणि टाटा स्टील यांच्या समभागात घसरण झाली. सेन्सेक्स मंगळवारी १००.४२ अंकांनी तर निफ्टी २४.५० अंकांनी घसरला होता.

आशियाई बाजारात बुधवारी टोकियो, शांघाय आणि सेऊलमध्ये घसरण तर युरोपियन बाजारात दुपारपर्यंत वाढ झाली होती. अमेरिकन बाजार मंगळवारी वधारला होता. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड २.४३ टक्के वधारुन प्रति बॅरल १०५.३ अमेरिकन डॉलर झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in