रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता; मासिक कर्जाचा हप्ता वाढणार

याआधीही रेपो रेटमध्ये वाढ केल्याने आधी कर्जदारांवर ईएमआयचा बोजा वाढला आहे.
रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता; मासिक कर्जाचा हप्ता वाढणार

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरण बैठकीत पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. वाढती महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये २५ ते ३५ अंकानी वाढ होऊ शकते. तसे झाल्यास सलग तिसऱ्यांदा व्याजदरवाढीचा धक्का सर्वसामान्यांना बसेल कारण त्यांचा ईएमआय अर्थात मासिक कर्जाचा हप्ता वाढणार आहे.

याआधीही रेपो रेटमध्ये वाढ केल्याने आधी कर्जदारांवर ईएमआयचा बोजा वाढला आहे. रिझर्व्ह बँकेने दोनदा मिळून रेपो रेटमध्ये ०.९० टक्का व्याजदरात वाढ केली आहे. आता पुन्हा एकदा व्याजदर वाढणार का याची चिंता नागरिकांना लागली आहे. कारण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे. यावेळी आरबीआय रेपो रेटमध्ये २५ ते ३५ बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर करू शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.

एकीकडे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे आयात महाग झाली आहे. जूनमध्ये, किरकोळ महागाईचा दर आरबीआयच्या टॉलरन्स लेव्हल दोन ते सहा टक्के पाहता त्यापेक्षा ७.०१ टक्के म्हणजे जास्त राहिला.सद्यस्थितीनुसार आरबीआय ऑगस्ट महिन्यात रेपो दरात २५ ते ५० बेसिस पॉइंट्सने वाढ करू शकते, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची वाढ होऊ शकते असे बँक ऑफ बडोदाला वाटत आहे. तर एचडीएफसी बँकेच्या मते, रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंट्सची वाढ शक्य आहे. याआधी दोन चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत आरबीआयने रेपो दरात ९० बेसिक पॉईंट्सची वाढ केली आहे. सध्या रेपो दर ४.९० टक्के आहे. व्याजदर आणखी वाढल्यास त्याचा फटका अनेक क्षेत्रांना सहन करावा लागू शकतो.

जीएसटीमध्ये अनेक पॅकिंग जीवनावश्यक वस्तूंचा समावेश केल्याने त्या वस्तूचे दर वाढले आहेत. दही, पनीर, लस्सी, पीठ अशा काही वस्तूंचा जीएसटीमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांचे रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करते की नाही याकडे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in