खाद्यतेलाच्या किमतीत कपात होण्याची शक्यता

खाद्यतेलाच्या किमतीत कपात होण्याची शक्यता

इंडोनेशियाने खाद्यतेल निर्यातीला घातलेली बंदी आणि नंतर रशिया - युक्रेन युद्धामुळे खाद्यतेल आणखी महागले

सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईने हैराण झाली आहे. त्यात खाद्यतेलाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यात आधी इंडोनेशियाने खाद्यतेल निर्यातीला घातलेली बंदी आणि नंतर रशिया - युक्रेन युद्धामुळे खाद्यतेल आणखी महागले. मात्र, आता पुन्हा एकदा तेलाच्या दरात कपात केली जात आहे. अदानी-विल्मरने खाद्य-तेलाच्या किमती प्रति लिटर १० रुपयांनी कमी केल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमतीत आणखी कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अदानी विल्मारने फॉर्च्युन रिफाइंड सनफ्लॉवर ऑइलची एक लिटर किंमत २२० रुपये प्रति लिटरवरून २१० रुपये केली आहे. कंपनीने एक निवेदन जारी करून सांगितले की, मोहरीच्या तेलाची एक लिटर किंमतही २०५ रुपयांवरून १९५ रुपये करण्यात आली आहे. याशिवाय जेमिनी एडिबल अँड फॅट्सने सूर्यफूल तेलाच्या एक लिटर पॅकेटवर १५ रुपयांची कपात केली आहे. कंपनी किमतीत आणखी कपात करू शकते, असे सांगण्यात येत आहे.

पामतेलाच्या कमी पुरवठ्यामुळे खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली होती. आता केंद्र सरकारने पामतेलावरील आयात शुल्कात कपात केल्यानंतर खाद्यतेल कंपन्यांनीही दरात कपात केली आहे. कंपन्यांनी सांगितले की, 'आम्हाला जो फायदा मिळत आहे तो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in