मराठी पाट्यांबाबत तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता

या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल्सना तातडीचा दिलासा देण्यास न्यायालयाने पुन्हा एकदा नकार दिला
मराठी पाट्यांबाबत तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता
Published on

मुंबईतील दुकाने किंवा आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या संबधित विभागाने तसा प्रस्ताव महानगरपलिका आयुक्तांकडे पाठवला असून एका आठवड्यात आयुक्त त्यावर निर्णय घेतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली.

यावेळी या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल्सना तातडीचा दिलासा देण्यास न्यायालयाने पुन्हा एकदा नकार दिला. मात्र पुढील सुनवणीपर्यंत मुंबई महानगरपालिकेकडून कठोर कारवाई करण्यात आल्यास हॉटेलमालक न्यायालयात दाद मागू शकतात, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

दुकाने किंवा आस्थापनांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी इंडियन हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in