मुंबई : मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार २२ मेपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २६ जूनला जाहीर होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ॲकेडमिक बँक ऑफ क्रेडिट आणि अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठामार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना https://muadmission.samarth.edu.in/ या संकेतस्थवळावर अर्ज करता येणार आहे. वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग १ जुलै २०२४ पासून सुरु करण्यात येणार असून सर्व पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांनी या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी असे विद्यापीठाने परिपत्रकात नमूद केले आहे.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
ऑनलाईन नाव नोंदणी आणि प्रवेश अर्ज सादर करणे - २२ मे ते १५ जून
विभागांमार्फत कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी - २० जून २०२४ (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत)
तात्पुरती गुणवत्ता यादी- २१ जून (संध्याकाळी ६ वाजता)
विद्यार्थी तक्रार - २५ जून (दुपारी १ वाजेपर्यंत)
पहिली गुणवत्ता यादी - २६ जून (संध्याकाळी ६ वाजता)
ऑनलाईन शुल्क भरणे - २७ जून ते ०१ जुलै (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)
द्वितीय गुणवत्ता यादी- ०२ जुलै (संध्याकाळी ६ वाजता)
ऑनलाईन शुल्क भरणे - ०३ जुलै ते ५ जुलै (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)
कमेंसमेंट ऑफ लेक्चर्स - ०१ जुलै