Mumbai : पालिकेचे ३ कर्मचारी गंभीर जखमी; पवईत गटार साफ करताना अंगावरून टेम्पो गेल्याची धक्कादायक घटना

पवई परिसरात महापालिकेचे तीन कर्मचाऱी गटार सफाईचे काम करत असताना त्यांच्या अंगावरून टेम्पो गेल्यामुळे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.
Mumbai : पालिकेचे ३ कर्मचारी गंभीर जखमी; पवईत गटार साफ करताना अंगावरून टेम्पो गेल्याची धक्कादायक घटना
Mumbai : पालिकेचे ३ कर्मचारी गंभीर जखमी; पवईत गटार साफ करताना अंगावरून टेम्पो गेल्याची धक्कादायक घटना
Published on

मुंबई : पवई परिसरात महापालिकेचे तीन कर्मचाऱी गटार सफाईचे काम करत असताना त्यांच्या अंगावरून टेम्पो गेल्यामुळे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. एक मे या कामगार दिनीच ही धक्कादायक घटना घडली आहे. पालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरकडून कामगार दिवस असताना गटार साफसफाई करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यावेळी गटारावरून टेम्पो गेल्यामुळे तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

दोघांची स्थिती गंभीर

याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, सफाईचे काम सुरू असताना पालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरकडून रस्त्यावर सुरक्षारक्षक उभा करण्यात न आल्यामुळे ही धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवार, १ मे रोजी कामगार दिवस आहे आणि कामगारांना सुट्टी असते. मात्र पवई परिसरात पालिकेकडून तबरेज सय्यद अली या व्यक्तीचा कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून गटाराची साफसफाई सुरू होती. कामगारांच्या काम करण्याच्या ठिकाणी फुटपाथवर टेम्पो चढून तिघांचा अपघात झाला. त्यामध्ये दोन जण खूप गंभीर जखमी अवस्थेत आहेत, तर एक जण किरकोळ जखमी आहे.

पवई पोलिसांकडून गुन्हा दाखल

सध्या पवई पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत कामगारांना उपचारासाठी जवळचा रुग्णालयामध्ये शिफ्टिंग केले आहे, तर यामध्ये चूक कोणाचा आहे यासंदर्भात गुन्हा दाखल करून पवई पोलीस पुढील तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in