पवई तलाव होणार स्वच्छ व सुंदर ; BMC ११ कोटी रुपये करणार खर्च

टाकाऊ पदार्थ, अस्वच्छता आणि वाढत्या जलपर्णीमुळे पवई तलावाच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे.
पवई तलाव होणार स्वच्छ व सुंदर ; BMC ११ कोटी रुपये करणार खर्च

मुंबई : टाकाऊ पदार्थ, अस्वच्छता आणि वाढत्या जलपर्णीमुळे पवई तलावाच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे. जलपर्णी आणि तलावातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. ही जलपर्णी काढण्यासाठी हार्वेस्टर यंत्र व एमफीबियस यंत्राचा वापर केला जाणार आहे. पालिकेकडून यासाठी सव्वाअकरा कोटी रुपये खर्च करणार आहे. या कामासाठी एस. के. डेव्हलपर्स या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. हे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

पूर्व उपनगरातील पवई तलाव हा मुख्य पर्यटन स्थळ आहे. या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तलावाचा परिसर अत्यंत सुंदर करण्यात आला असून त्या ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा कल वाढला आहे. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी पर्यटक येतात. मात्र तलावातील जलपर्णी वाढल्याने तलावाचे सौंदर्य बाधित झाले आहे. त्यामुळे तलावाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी तसेच तलावातील जैव विविधता जतन करण्यासाठी- संवर्धन करण्यासाठी सफाई मोहीम हाती घेतली जाणार आहे.

पवई तलावातील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुढील १८ महिने या तलावाची देखभालही करणे आवश्यक आहे. विशिष्ट यंत्रांच्या सहाय्याने जलपर्णी तसेच टाकाऊ पदार्थ बाहेर काढल्यानंतर त्यांची डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावली जाईल. या कामासाठी एस. के. डेव्हलपर्स या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी ८ कोटी ३७ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in