महाविकास आघाडीने मुंबईमध्ये महामोर्चाचे आयोजन केले होते. भाजपविरोधात झालेल्या या आंदोलनात अनेक लहानमोठ्या संघटनांनी सहभाग दर्शविला होता. मात्र, या महामोर्चाला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) मात्र अनुपस्थित होते. याबद्दल त्यांना विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "हा मोर्चा महाविकास आघाडीचा होता. त्यांच्यामध्ये आमचा समावेश करून घेण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. त्यामुळे आमचा त्या महामोर्चात सहभागी होण्याचा काहीच संबंध येत नाही. उद्धव ठाकरे यांनी आमचा समावेश करून घेण्याबाबत निर्णय घ्यावा," असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रकाश आंबेडकर टीका करताना म्हणाले की, "काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरिबाला सत्तेत येऊनच द्यायचे नाही. खार तर हा मोर्चा शिवसेनेचा होता. फक्त नावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा समावेश यामध्ये होता. उद्धव ठाकरेंनी आम्हाला समावेशाबद्दल कळवले होते की आम्ही वंचितला महाविकास आघाडीमध्ये घायचा विचार करू. मात्र हा प्रश्न अजून विचाराधीन आहे असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले होते. यावरून आमचा समावेश महाविकास आघाडीत करून घेणार नाही, असाच होतो."