

मुंबई : प्रख्यात कलावंत प्रकाश बाळ जोशी यांना मोरोक्कोतील ७व्या आंतरराष्ट्रीय फाइन आर्ट्स फेस्टिव्हलमध्ये (एफआयएपी २०२५) विशेष आमंत्रित कलावंत म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. कॅडी एय्याड युनिव्हर्सिटीने सर्व नियोजन केले आहे. “कचऱ्यातून जन्मलेल्या कलाकृतींना नवे कथानक आणि अमर जीवन देणे” या संकल्पनेवर आधारित हा अनोखा महोत्सव ९ ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे.
प्रकाश बाळ जोशी यांच्या ॲबस्ट्रक्ट पेंटिगला जगभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे . त्यांच्या कलाकृती फक्त सुंदर नाहीत, त्या पर्यावरण जागृतीचे प्रभावी माध्यमही आहेत. त्यांना या प्रतिष्ठित महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आल्याने एक प्रकारे भारतीय कलावंताचा सन्मान असून त्या निमित्ताने मराकेशच्या लाल भिंतींमध्ये भारतीय रंग उमलणार आहे. प्रकाश बाळ जोशी यांनी आपल्या प्रतिभेने देशासह देशाबाहेरही नावलौकिक कमावला आहे. जगभर त्यांचा चाहता वर्ग आहे.