भाईंदर : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना कोणी तरी चुकीची माहिती दिली आहे. ही जागा शासनाच्या मालकीचीच राहणार असून रितसर नियमासह शैक्षणिक कार्यासाठी दिली आहे, असा खुलासा परिवहन मंत्री प्रताप - सरनाईक यांनी केला आहे.
सरनाईक यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा - तपशीलवार खुलासा केला. त्यांनी - सांगितले की, काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी उल्लेख केलेली जागा मौजे घोडबंदर सर्व्हे क्रं. २३३ सरकारी आकारी पडीतमधील ८०२५ चौ.मी. जागा ही त्यांच्या मोठ्या सुनेच्या 'मे. सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट' या संस्थेला शैक्षणिक कार्यासाठी भाडेतत्त्वावर दिली. सर्व शासकीय प्रक्रिया व निविदा पूर्ण केल्यानंतरच हा व्यवहार करण्यात आला आहे. या जागेचा कब्जा आणि वहिवाट पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने झाली आहे. या व्यवहारासाठी आम्ही ४ कोटी वडेट्टीवारांना कोणीतरी चुकीची माहिती दिली
५५ लाख रुपये कब्जे वहिवाटीची रक्कम भरली आहे. १ कोटी २८ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली. सर्व कागदपत्रे शासन नियमांनुसार तयार केली असून या ट्रस्टमार्फत त्या जागेवर शैक्षणिक आणि सामाजिक प्रकल्प राबवले जाणार आहेत. ही जमीन माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणाच्या नावावर नाही. ट्रस्टमार्फत सर्व काम पारदर्शक पद्धतीने करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.