दहीहंडी खेळताना थरावरून पडून जखमी झालेल्या प्रथमेश सावंत चा केईएम रुग्णालयात मृत्यू

गेल्या महिन्याभरापासून प्रथमेशवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याला न्यूमोनिया झाला. दरम्यान, आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन
दहीहंडी खेळताना थरावरून पडून जखमी झालेल्या प्रथमेश सावंत चा केईएम रुग्णालयात मृत्यू
Published on

दहीहंडी खेळताना थरावरून पडून गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या तरुणाचा आज मुंबईतील केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या महिन्याभरापासून प्रथमेशवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याला न्यूमोनिया झाला. दरम्यान, आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. प्रथमेश सावंत 20 वर्षांचा होता. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा दहीहंडीवर कोणतेही बंधन नसल्याची घोषणाही सरकारने केली होती. प्रथमेश त्याच्या स्थानिक मंडळाच्या गोविंदा संघात सहभागी झाला होता. दहीहंडी फोडताना जमिनीवर पडल्याने प्रथमेश गंभीर जखमी झाला. त्याच्या पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे शरीराची हालचाल आणि संवेदना थांबल्या होत्या. प्रथमेशवर केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. यंदा मुंबई-ठाण्यात सुमारे अडीचशे गोविंद जखमी झाले. त्यापैकी १९७ गोविंदांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. प्रथमेश सावंतच्या मृत्यूने कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.

प्रथमेश लहान असताना त्याच्या आईचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर त्याचे वडील आणि बहिणीचे आजारपणात निधन झाले. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या प्रथमेशची काळजी त्याचे काका-काकी घेत होते. आयटीआयमध्ये शिकत प्रथमेश डिलिव्हरी बॉय म्हणून घरोघरी जेवण पोहोचवण्याचे कामही करत होता. त्यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांना ५ लाखांची मदत केली होती.

logo
marathi.freepressjournal.in