Mumbai : प्रतीक्षानगरमध्ये गॅझेबोचा स्लॅब कोसळला; पाच जण जखमी

प्रतीक्षानगर येथील माळा गार्डन परिसरात बुधवारी सायंकाळी आसनव्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या गॅझेबोचा सिमेंटचा स्लॅब कोसळण्याची घटना बुधवारी सायंकाळी ४.४८ वाजण्याच्या सुमारास घडली.
Mumbai : प्रतीक्षानगरमध्ये गॅझेबोचा स्लॅब कोसळला; पाच जण जखमी
Mumbai : प्रतीक्षानगरमध्ये गॅझेबोचा स्लॅब कोसळला; पाच जण जखमी X
Published on

मुंबई : प्रतीक्षानगर येथील माळा गार्डन परिसरात बुधवारी सायंकाळी आसनव्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या गॅझेबोचा सिमेंटचा स्लॅब कोसळण्याची घटना बुधवारी सायंकाळी ४.४८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत पाच जण जखमी झाले असून जखमींवर सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सायन प्रतीक्षा नगर माळा गार्डन, टी/१८ इमारतीसमोर जीआय फ्रेम आणि सिमेंटच्या स्लॅबपासून तयार करण्यात आलेली आसनव्यवस्थेची ही रचना अचानक कोसळली. सुरुवातीला ढिगाऱ्याखाली तीन ते चार जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच जखमींना खासगी रुग्णवाहिकांमधून सायन रुग्णालयात नेण्यात आले.

सायन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत धोंडीराम घोपकर (६५), गणपत आंबोले (७९), प्रमिला जाधव (६८), लक्ष्मी शितलिया (६५) आणि सुनीता मोरे (६४) हे पाच जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी केली. गॅझेबोची रचना नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, याबाबत तपास करीत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in