कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य- डॉ. संजय बापेरकर

मुंबई महापालिकेतील शिवसेना- उबाठा प्रणित म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या 'उपाध्यक्ष' पदी कामगार नेते डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांची निवड झाली आहे
कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास प्राधान्य- डॉ. संजय बापेरकर

मुंबई : मुंबई महापालिकेतील शिवसेना- उबाठा प्रणित  म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या 'उपाध्यक्ष' पदी कामगार नेते डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांची निवड झाली आहे. युनियन मेळाव्यात शिवसेना उपनेते भाऊ कोरगांवकर व युनियनचे अध्यक्ष बाबा कदम यांनी बापेरकर यांचे स्वागत केले. शिवसेना - उबाठा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी 'शिवबंधन' बांधून नुकताच त्यांना पक्षप्रवेश दिला होता. मेळाव्यात युनियनचे अध्यक्ष बाबा कदम यांनी डॉ. संजय बापेरकर यांची 'उपाध्यक्ष'पदी निवड केल्याचे जाहीर करून डॉ. बापेरकर शिवसेना युनियन मोठी करतील, असा विश्वास व्यक्त केला. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना सेना युनियनच्या झेंड्याखाली आणून कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार, असे प्रतिपादन डॉ. संजय बापेरकर यांनी केले. सरचिटणीस सत्यवान जावकर, कार्याध्यक्ष सुनिल चिटणीस,उपाध्यक्षा रंजनाताई नेवाळकर,सल्लागार हरिश जामठे यांनी बापेरकर यांना शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in