जीपी पारसिक सहकारी बँकेचे अध्यक्ष नारायण गावंड यांना 'सहकाररत्न राज्यस्तरीय गौरव' पुरस्कार

हे यश इतरांना प्रेरणादायी ठरावे व समाजाच्या विविध क्षेत्रांचा विकास होण्यास आपला हातभार लागावा : अध्यक्ष नारायण गावंड
जीपी पारसिक सहकारी बँकेचे अध्यक्ष नारायण गावंड यांना 'सहकाररत्न राज्यस्तरीय गौरव' पुरस्कार
Published on

मुंबईच्या श्री शिवशक्ती सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने १७वा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच परेलच्या दामोदर हॉल येथे संपन्न झाला. त्यावेळी कळवा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादित या संस्थेचे माजी अध्यक्ष व जीपी पारसिक सहकारी बँकेचे अध्यक्ष नारायण गावंड यांना त्यांच्या निस्सीम समाज सेवेबद्दल सहकाररत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुकाराम काते (मा. शिवसेना आमदार) यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी अॅड. अच्युत पाटील (वरिष्ठ उपाध्यक्ष विधी विभाग), संजिवनी जाधव (ज्येष्ठ अभिनेत्री), भालचंद्र पाटील (अध्यक्ष, श्री शिवशक्ती सामाजिक प्रतिष्ठान, मुंबई), बजरंग चव्हाण (उपाध्यक्ष, राष्ट्रीय मिल मजदूर संघ), दिलीप बारटक्के (मा. नगरसेवक, ठाणे मनपा) अॅड. रचना अग्रवाल (सरचिटणीस, म्यु.क.का.सेना) आणि मान्यवर मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. हे यश इतरांना प्रेरणादायी ठरावे व समाजाच्या विविध क्षेत्रांचा विकास होण्यास आपला हातभार लागावा, असे श्री शिवशक्ती सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र काशिनाथ पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in